मिल्खा सिंग हे कोणत्या खेळात जग प्रसिद्ध होते ?
आजचे सराव प्रश्न
________


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ
---------------------------------------------------
२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
---------------------------------------------------
२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू
_______________
🔴भारतीय पतदर्जा संस्था🔴

❇️CRISIL:-

🔳पतदर्जा ठरवणारी पहीली संस्था

🔳स्थापना:-1987

🔳कार्य सुरू:-1 जानेवारी 1988

🔳मुख्यालय:-मुंबई

❇️ICRA:-

🔳स्थापना:-16 जानेवारी 1991

🔳कार्य सुरू:-1 सप्टेंबर 1991

🔳मुख्यालय:-दिल्ली

❇️CARE:-

🔳स्थापणा:-एप्रिल 1993

🔳कार्य सुरू:-नोव्हेंबर1993

🔳मुख्यालय:-मुंबई
मूलभूत कर्तव्ये

1.भारतीय संविधान देशातील आदर्श संस्थाने राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रीय गान यांचा सन्मान करावा

2.स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्त्वांचे पालन करावे

3.भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे

4.देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करताच संरक्षण करण्याकरिता सामील व्हावे.

5.सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे. जे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे. व असे सर्व रीतींचा / प्रथांचा त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असेल.

6.सामाजिक सांस्कृतिक गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे.

7.नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन करावे रक्षण करून संवर्धन करावे त्याचबरोबर प्राणिमात्रांच्या प्रति दयाभाव ठेवावे.

8.मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.

9.सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे.

10.व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा. ज्यानी राष्ट्राची प्रगती होईल.

11.प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील.
मुद्रा बँक ( Micro Units Development and Refinance Agency – MUDRA)

सुरवात – 8 एप्रिल, 2015

– योजनेची घोषणा – वित्तमंत्री अरुण जरतली यांनी 2015-16 च्या अंदाजपत्रकीय भाषणात मुद्रा योजनेची घोषणा केली.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उददेश –
१) सूक्ष्म वित्त संस्था (MFI) आणि छोटे व्यापारी, रिटेलर, स्वसहाय्यता गट आणि व्यक्तींना उधार देणाऱ्या कंपनीस वित्तीय प्रक्रियांमध्ये मदत करणे

२) लघु व सूक्ष्म व्यवसाय करणाऱ्या स्व उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणे.

३) व्यवसाय सूक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना धोरण ठरविण्यासाठी मार्गदर्शन तत्वे ठरवून देणे.

४) सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांची नोंदणी करणे व अशा संस्थांवर देखरेख, ठेवणे त्याच बरोबर त्यांचा दर्जा ठरविणे.

५) सूक्ष्म  येणाऱ्या कर्जासाठी ग्यारेंटि  क्रेडिट ग्यारेंटि स्कीम तयार करणे.

६) वितरित करण्यात आलेल्या कर्जाची पाहणी, कर्ज देणे आणि देण्याच्या प्रक्रियेमध्ये मदतीसाठी योग्य तंत्रज्ञान उपलब्ध करणे.

७) लघुउद्योजकांना वित्त पुरवठा करणे.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

मुद्रा बँकेचे लक्ष्य –

१) अनोपचारिक क्षेत्रातील लघु व्यावसायिक आणि देशातील  इतर महत्वाकांक्षी छोट्या व्यावसायिकांना 5.7 कोटीपेक्षा अधिक बँक कर्ज उपलब्ध करणे.

२) छोट्या उद्योगांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करणे.

 

– या योजने अंतर्गत कर्जाची उपलभडता हि फक्त छोट्या व्यापारासाठी करण्यात आली आहे.

– हि योजना शेती, वाहतूक, सामुदायिक, सामाजिक व वयक्तिक सेवा, खाद्य उत्पादन आणि टेक्सटाईल क्षेत्र इ. साठी लागू करण्यात आले आहे.

– या योजने अंतर्गत शैक्षणिक, घर खरेदी करणे यासारख्या उद्देशांसाठी कर्ज दिले जात नाही.

 
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मुद्रा बँक  योजनेचा लाभ

१) या योजनेतून शिक्षित युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.

२) या योजनेतुन छोट्या व्यापाराचे मनोबल वाढून देशाचा आर्थिक विकास साध्य करता येईल.

 

– मुद्रा बँक योजनेअंतर्गत लघुउद्योगांना विकासाच्या अवस्थांच्या आधारे  प्रकारे वित्त पुरवठा केला जातो.

१) शिशु श्रेणी व्यवसायास 50,000 ते कर्ज मिळू शकते.

२) किशोर श्रेणी व्यवसायात 50,000 ते 5,00,000 रु. कर्ज मिळू शकते.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्राण्यांपासूनच मानवाला करोनाची लागण

कोविड १९ विषाणू हा वटवाघळातून मानवात एका मध्यस्थ यजमान प्राण्याच्या मार्फत पसरला, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात केला असून त्याची कच्ची प्रत ‘दी असोसिएटेड प्रेस’ला मिळाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे जे पथक चीनला गेले होते त्याला चीनने पुरेशी माहिती मिळू दिली नाही हे खरे असले तरी जी माहिती थोड्याफार प्रमाणात हाती आली आहे त्यानुसार हा विषाणू मानव व वटवाघळे यांच्यातील मध्यस्थामार्फत पसरला असावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने काढलेला हा निष्कर्ष अजिबात धक्कादायक नाही, पण त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला हा मुद्दा सोडून सर्व निष्कर्षांवर आणखी संशोधनाची गरज जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने व्यक्त केली.
एपी वृत्तसंस्थेला जागतिक आरोग्य संघटनेचा अंतिम स्वरूपातील अहवाल मिळाला असून त्यानुसार हा विषाणू वटवाघळातून एखाद्या मध्यस्थ प्राण्यातून मानवात आला. पण या अहवालात नंतर चीनच्या दबावाखाली बदलही करून घेतले जाऊ शकतात. मध्यस्थ प्राण्यामार्फत संक्रमण हा सगळ्यात पहिला टप्पा असून वटवाघळातून थेट मानवात प्रसार झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. शीत साखळी म्हणजे अन्नपदार्थातून या विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता नाही. करोना ज्या विषाणूमुळे होतो त्याच्या अगदी जवळ जाणारा विषाणू वटवाघळात सापडला असून हीच वटवाघळे करोना विषाणूचे वहन करीत असतात. वटवाघळातील विषाणू व करोना विषाणू यांच्यातील कालिक अंतर हे काही दशकांचे असू शकते पण त्यातील दुवा ओळखता आलेला नाही, म्हणजे कुठल्या मध्यस्थ प्राण्यामार्फत वटवाघळातील विषाणू वेगळ्या स्वरूपात मानवात आलेला आहे हे समजलेले नाही.
चीनमधील मांस व सागरी अन्न बाजारपेठ असलेल्या हनान येथून हा विषाणू पसरल्याचा संशय असला तरी हे विषाणू या बाजारपेठेत कुठून आले, नंतर कसे गेले याबाबत कुठलेही स्पष्टीकरण करता येत नाही, असे अहवालात म्हटले आहे. शीतपेटयांमुळे हे विषाणू जास्त अंतरापर्यंत पसरले असावेत असे सांगितले जात होते. पण अहवालात म्हटले आहे, की त्यामुळे एवढी मोठी साथ पसरली असेल असे मानता येणार नाही. हा विषाणू चीनमध्ये बाहेरून आलेल्या गोठवलेल्या पदार्थांतून आला असे गृहित धरले तरी २०१९ च्या सुरुवातीला विषाणूचा जास्त प्रसार नव्हता.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे, की ज्या पद्धतीने व प्रक्रियेने हा अहवाल तयार करण्यात आला तो पाहता हा अहवाल लिहिण्यात चीननेच मदत केल्याचे दिसते. चीनने हा आरोप फेटाळला असून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले, की अमेरिका या अहवालावर बोलत आहे, तसे करून अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ गटावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार

🔸मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

🔸त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

🔸१५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔸दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो.

🔸 देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो.

🔸 याआधी १९९३ मध्ये  विजय तेंडुलकर व  २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता.

⚡️१९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

🔸शरणकुमार लिंबाळे यांची ४० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.
अर्थसंकल्पांचे स्वरूप

* पारंपरिक अर्थसंकल्प – पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो. उदा. समजा, सरकारद्वारे एखादा कार्यक्रम चालू आहे तर पारंपरिक अर्थसंकल्पात क्ष रुपये एवढा त्या कार्यक्रमासाठी खर्च होईल असा उल्लेख असतो. सध्या प्रचलित अर्थसंकल्पाच्या प्रारंभिक स्वरूपालाच पारंपरिक अर्थसंकल्प असे म्हणतात. याचा मुख्य उद्देश संसदेच्या कार्यपालिकेवर वित्तीय नियंत्रण ठेवणे हा असतो.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

महसुली अर्थसंकल्प – महसुली अर्थसंकल्पात महसुली/ चालू खात्यावरील जमाखर्चाचा समावेश होतो. महसुली जमा व खर्चाचा समावेश होतो, ज्याअंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो- महसुली जमा, महसुली खर्च.

महसुली जमा याअंतर्गत अ) कर उत्पन्न, ब) करेतर उत्पन्न. करेतर उत्पन्नात

१) राजकोषीय सेवा म्हणजेच चलनी नोटा व नाण्यांमधून मिळणारा नफा

२) व्याज उत्पन्न- ज्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, रेल्वे व पोस्ट सेवांवरील व्याज तसेच सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज यांचा समावेश होतो. याशिवाय

३) नफा व लाभांश, ज्यात महसुली जमा याअंतर्गत आर.बी.आय., सार्वजनिक बँक, एल.आय.सी., सार्वजनिक उद्योगांचा नफा यांचा समावेश होतो.

महसुली खर्चात महसुली योजना खर्च म्हणजे सामाजिक मालमत्तेच्या देखभालीवरील खर्च तसेच महसुली बिगर योजना खर्च म्हणजे

१) घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च

२) संरक्षणाचा महसुली खर्च

३) अनुदाने

४) नागरी प्रशासन खर्च उदा. पगार, कार्यालयीन खर्च इ. तसेच

५) राज्य सरकारे व केंद्रीय प्रदेशांना दिलेली अनुदाने यांचा समावेश होतो.

* भांडवली अर्थसंकल्प – भांडवली अर्थसंकल्पात भांडवली खात्यावरील जमा व खर्चाचा समावेश होते. भांडवली जमा याअंतर्गत निव्वळ कर्जउभारणी, सरकार वापरत असलेल्या अल्पबचती उदा. पोस्टातील बचती, पेन्शन, प्रॉव्हिडंड फंड इ. तसेच राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. दिलेल्या कर्जाची वसुली, याशिवाय निर्गुतवणूक व्यवहारातून प्राप्त होणारा नफा इ.चा समावेश भांडवली जमा याअंतर्गत होतो, तसेच भांडवली खर्चात भांडवली योजना खर्च, ज्याअंतर्गत

१) केंद्रीय योजना उदा. जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा इ.वरील खर्च

२) राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्राने दिलेली मदत तसेच भांडवली बिगरयोजना खर्च, ज्यात

१) संरक्षणाचा भांडवली खर्च, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. दिलेली कर्जे

३) घेतलेल्या कर्जाची परतफेड यांचा समावेश होतो.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
प्रधानमंत्री आवास योजना ( सर्वांसाठी घरे अभियान शहरी)

प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 25 जून, 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे करण्यात आली. 

मंत्री आवास योजनेची प्रथम सुरुवात हाउसिंग फॉर ऑल नावाने करण्यात आली होती त्यानंतर त्यांचे नामकरण प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले .

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती

आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग

स्त्रिया

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4041 सर्व वाड्या-वस्त्या सहभागी केल्या जातील परंतु सध्या 500 शहरांचा  रोडमॅप तयार करण्यात आला आहे

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

प्रधानमंत्री आवास योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे

पहिला टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला टप्पा एप्रिल 2015 ते मार्च 2017 दरम्यान राहील ज्यामध्ये समावेश करण्यात आला आहे

दुसरा टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्पा एप्रिल 2017 ते मार्च 2019 दरम्यान राहील ज्यामध्ये 200 पेक्षा अधिक शहरांचा समावेश करण्यात येईल

तिसरा टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा टप्पा एप्रिल 2019 ते मार्च 2022 दरम्यान राहील ज्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील राहिलेल्या सर्व शहरांचा समावेश करण्यात येईल

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुख्यतः गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत गृहकर्जाचे व्याजदर 6.5% आकारण्याचा प्रस्ताव आहे साधारण गृहकर्जाचे व्याजदर 10.5 टक्के राहतो अशाप्रकारे या योजनेत लाभार्थ्यास 2000 रुपये प्रति महिना EMI  भरावा लागेल

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈केगाव.( सोलापूर )

💐 भारतीय अर्थशास्राचे जनक कोण ?
🎈दादाभाई नौरोजी.

💐 भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण ?
🎈विक्रम साराभाई.

💐 भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता ?
🎈सिंधुदुर्ग.

💐मनोज तुली हा कलावंत कोणत्या नावाने ओळखला जातो ?
🎈कुमार गौरव.
MPSC Economics:
स्टार्टअप इंडिया योजनेची वैशिष्ट्ये

उद्योजकांसाठी सरकारी नियम आणि बंधने कमी करणे

लघुउद्योग निर्मितीतील परवाना राज व परकीय गुंतवणूक अडथळे समाज करणे

रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी शाश्वत आर्थिक वृद्धीला चालना देणे

देशातील महिला उद्योजकांची प्रोत्साहन देणे

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्टार्टअप इंडिया योजनेतील तरतुदी

स्टार्टअप इंडियासाठी स्वयम् प्रमाणित पद्धत असेल

याअंतर्गत पहिल्या तीन वर्षांसाठी कायद्यांच्या पालनासाठी  कोणतीही शासकीय पाहणी होणार नाही

स्टार्टअप इंडिया साठी पत्र हमी निधी

स्टार्टअप इंडिया साठी अर्ज आणि वेब पोर्टल सुरू राहील एक साधारण अर्ज असेल त्याद्वारे रजिस्ट्रेशन करणे सोपे होईल

स्टार्टअप इंडिया अंतर्गत पेमेंट मिळविण्यासाठी नोंदणी निशुल्क करण्याचा सरकारचा प्रयत्न असून अर्ज सादर करण्याच्या शुल्कात 80%  सूट देण्यात येणार आहे

🌹🔻🌹🔻🌹🔻🌹🔻🌹🔻🌹

स्टार्टअप साठी बंद व्यवस्था

उद्योग बंद करण्यासाठी सरकारी उद्योग व्यवस्थापन करण्यात येणार असून 90 दिवसात बंद करण्यासाठी संसदेत नवा कायदा सादर करण्यात येणार आहेत

स्टार्टअप ची गरज पूर्ण करण्यासाठी नव उद्योजकांची दहा हजार कोटी रुपयांचे भांडवल find उभारण्यात येईल

स्टार्टअप अंतर्गत उद्योगांना भांडवली लाभ करात सूट देण्यात येणार आहे

स्टार्टअप अंतर्गत नवउद्योजक तीन वर्षांपर्यंत उत्पन्न करातून सूट देण्यात येणार आहे

स्टार्टअप अंतर्गतमहिला नवउद्योजक as विशेष सवलती देण्यात येतील

स्टार्टअप अंतर्गत PPP सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल ही सहभागी करण्यात आले आहे

त्याचबरोबर इतर 35 मॉडेल्सचा समावेश आहे

नवनवीन कल्पनांना पाठबळ देण्यासाठी हॉटेल इनोव्हेशन लागू करण्यात येणार आहे

नवोपक्रम कार्यक्रम देशातील पाच लाख शाळांपासून सुरू करून 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात

1 एप्रिल 2016 पर्यंत स्टार्टअप  मोबाईल ॲप तयार करून त्यामाध्यमातून छोटेखानी आणि सुटसुटीत अर्ज करता येतील.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
◾️ हेनले पोसपोर्ट निर्देशांकात २००६ ते २०२१ भारताचे स्थान

🇮🇳 २००६ : ७१वे
🇮🇳 २००७ : ७३वे
🇮🇳 २००८ : ७५वे
🇮🇳 २००९ : ७५वे
🇮🇳 २०१० : ७७वे
🇮🇳 २०११ : ७८वे
🇮🇳 २०१२ : ८२वे
🇮🇳 २०१३ : ७४वे
🇮🇳 २०१४ : ७६वे
🇮🇳 २०१५ : ८८वे
🇮🇳 २०१६ : ८५वे
🇮🇳 २०१७ : ८७वे
🇮🇳 २०१८ : ८१वे
🇮🇳 २०१९ : ८२वे
🇮🇳 २०२० : ८२वे
🇮🇳 २०२१ : ८५वे .
भारतीय वंशाची गीतांजली राव ठरली Kid of the Year, 15 वर्षांची चिमुरडी TIMEच्या सन्मानाची पहिली मानकरी

भारतीय-अमेरिकन असलेल्या गीतांजली राव (Gitanjali Rao) या 15 वर्षांच्या मुलीने या वर्षाचा पहिल्या 'टाईम्स किड'चा (TIME's first-ever Kid) बहुमान पटकावला आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण (Water Pollution) ते औषधांचं व्यसन (Opioid Addiction)आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे. यासाठी'टाईम्स'ने सन्मानाने तिचा गौरव केला आहे.
चीनची चंद्र मोहीम

» चीनचे चँग ५ हे अवकाशयान चंद्रावर ४ डिसेंबर २०२० रोजी यशस्वीरीत्या उतरले.
» अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.
» हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे.
» त्याचे लँडर, ऑर्बिटर,अ‍ॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.
» चंद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.
» यापूर्वी अमेरिकेने १९६९ मध्ये अपोलो मिशन दरम्यान चंद्रावर पहिला ध्वज लावला होता.
स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांचे उद्घाटन

17 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाकडे जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देत आहेत.

याप्रसंगी, दाभोई-चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड-केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरण केलेला प्रतापनगर-केवडिया मार्ग आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही उद्घाटन झाले.

ठळक बाबी

रेल्वेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकाच ठिकाणी जाणाऱ्या गाडयांना एकाच वेळी रवाना करण्यात आले आहे.
या गाड्या चेन्नई, वाराणसी, रेवा, दादर आणि दिल्ली तसेच प्रतापनगर, चांदोड येथून सोडण्यात आल्या.

याचा फायदा पर्यटक आणि स्थानिक आदिवासी दोघांनाही होणार आहे. कारण त्यामुळे स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार.

केवडिया स्थानक हे हरित इमारत प्रमाणीकरणासह कार्यरत होणारे भारतातले पहिले रेल्वे स्थानक आहे.

केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. तेथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण पार्क यांचा समावेश आहे. त्यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. तेथील एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत.

गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंचीचा आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे.

हा पुतळा राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर उभारलेला आहे. ही शिल्पाकृती जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारली. विक्रमी 33 महिन्यांमध्ये पुतळ्याचे बांधकाम केले गेले.
https://pnic.in/current-affairs/

☝️☝️☝️☝️☝️
जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ?
MPSC च्या अभ्यासासाठी चालू घडामोडी अत्यंत आवश्यक असतात, त्यामुळे आपण नेहमी वृत्तपत्र वाचत असतो. पण वृत्तपत्रात सर्वच बातम्या वेळोवेळी मिळतात असे नाही. तर मी एक नवीन ॲप शोधले आहे ज्याच्या माध्यमातून आपण देशात आणि जगात घडलेल्या बातम्या क्षणात आपल्या पर्यंत पोहचू शकता !
ही काही जाहिरात वैगरे नाही, किंवा हे काही मी बनवलेले ॲप नाहीये, यात माझा कोणताही profit देखील नाहीये ... प्रसिद्ध वृत संस्था दैनिक भास्कर यांचे हे ॲप आहे. फक्त तुमच्या फायद्यासाठी हे ॲप मी तुम्हाला शेअर करतो आहे. मी १ आठवड्यापूर्वी हे ॲप डाऊनलोड केले आणि मला हे खूप आवडले तुम्ही देखील हे एकदा download नक्की करून बघा 😊

https://dainik-b.in/ycKv34qtjob
🌍 तलाठी मेगा भरती साठी सर्व मटेरियल फ्री मध्ये आम्ही आमच्या telegram चॅनल वर अपलोड केले आहेत, आणि अजूनही करणार आहोत. म्हणून आजच आमचा telegram चॅनल जॉईन करा.
टेलिग्राम वर सर्च करा - Adda247 Marathi
LINK :- https://www.tg-me.com/Adda247_Marathi
🏛 गरजवंतांपर्यंत ही लिंक नक्कीच पोहचवा
2024/04/27 23:42:14
Back to Top
HTML Embed Code: