Telegram Group Search
बागलाणची शान परिसरात साल्हेर वरुन दिसणारा सह्याद्रीच्या मस्तकावर ऐटीत साक्ष देत उभा असलेला किल्ला सालोटा...🚩

इतिहासाबरोबरच इथल्या दुर्गांची दुर्गबांधणी हा एक अभ्यासाचाच वेगळा विषय आहे अनेक राजवटी नांदल्या, आणि या वेगवेगळ्या कालखंडात इथे भरपूर गडकिल्यांची उभारणी केली गेली किल्ले उभारताना वेगवेगळ्या दृष्टीकोनातून, कल्पकतेने निरनिराळे प्रयोग राबवून या दुर्गांची उभारणी केल्याचे आपल्याला दिसून येते...

शिवकाळातील गडकोटांचे महत्त्व सांगून जातात राज्याच्या संरक्षणासाठी, आक्रमण काळात, राज्यसंरंक्षणाच्या दृष्टीने, या किल्ल्यांचा खूप मोठा उपयोग झाला आहे म्हणूनच एकप्रकारे गडकोट राज्याचा खजिना होते राजलक्ष्मी होते प्राणापलिकडेही जपलेले आणि बांधलेले हे गडकिल्ले पवित्र होते वंदनीय होते...

“सह्याद्रीने भटक्यांना जगावे कसे ते शिकवले आणि मरावे कसे ते हि शिकवले एकदा बघावे त्याच्या उत्तुंग शिखरांकडे अशी शिखरे की जी एकेकटीचं आकाशाशी झट्या घेत आहेत...”

📷 @shree__kala 👌🏼♥️🔥
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*स्वप्नांच्या क्षितिजाला कुठलेही बंधने नसतात. फक्त झेप घेतल्यावर नाळ मातीशी ठेवा.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण

ज्याच्याकडे शेत कसण्याची कूवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोड़ी नाही, बी – बियाणे नाहीत त्याला दोनचार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी – बियाणे द्यावेत.

● शेतकर्यास सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसुल करावे.

● गावचा गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावे कोणाकडे मनुष्यबळ आहे, बैल आहेत यांची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी

.● नवीन शेतकर्यास सोईसवलती देऊन पडिक जमीन लागवडीखाली आणावी त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी.

● ज्या शेतकर्यावर सरकारची मागील बाकी येणे आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही अशा शेतकर्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी. त्याच्यावरील कर्ज माफ़ करण्यासारखे असेल तर तसे कळवावे.

शेतकऱ्यांना सोईसवलती देणे, कर्जमाफ़ी देणे ही सेवा आहे पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नये हे परिवर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवले ते परिवर्तन आज घडण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचा विचार करायला हवा.

शिवराय_असे_शक्तीदाता
प्रथम हाती धरा नांगर नंतर चालवा तलवार..
आधी भरा पोट आणि मग करा गनिमावर वार...

अर्धपोटी सैन्य कधीच प्राणपणे लढा देऊ शकत नाही हे ओळखूनच भूमिपुत्राच्या हातात प्रथम नांगर देऊन त्यांना पोटाला लावत स्वराज्य स्थापणारे छत्रपती शिवराय हे एकमेवच..!

――――――――――――
🎨 @rambdeshmukh 👌🏼♥️🔥
औरंगजेबाच्या तंबुचा कळस कापून नेणाऱ्या विठोजीराव चव्हाण यांचे पराक्रमी पुत्र सेनापती हिम्मतबहाद्दर उदाजीराव चव्हाण..🚩

हिम्मतबहादर उदाजीराव चव्हाण (१६८०-२४ नोव्हेंबर १७६२)..

उदाजीराव चव्हाण यांचा जन्म १६८० मध्ये झाला, उदाजीरव हे डिग्रजकर चव्हाण घराण्यातील, सरसेनापती संताजी घोरपडे यांना मदत करणाऱ्या हिम्मत बहाद्दर विठोजी चव्हाण यांचा हा पुत्र होता. या चव्हाण घराण्याचे मूळ पुरुष बालोजी. त्यांचे पुत्र राणोजीराव चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वाचे सरदार आणि लष्करात मोठ्या हुद्दयावर काम करत होते..

राणोजीरावांनी महाराजांसोबत बऱ्याच मोहिमांत भाग घेतला होता. सुरतेच्या स्वारीत राणोजीराव होते, असा उल्लेख सापडतो. नंतर सिद्दी जोहरच्या जंजिरा मोहिमेत लढत असताना ते धारातीर्थी पडले. त्यांचे दोन पुत्र होते पैकी मोठे विठोजीराव व धाकटे मालोजीराव. विठोजीराव वयाने साधारण १८ वर्षांचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सरदार बनवले व त्यांना एका तुकडीवर लष्करी अधिकारी नेमून स्वराज्य सेवेत सामावून घेतले. महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतही विठोजीरावांनी लष्करी सेवा इमानेइतबारे पार पाडली..

दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही व मराठय़ांचे स्वराज्य संपवण्याचे ठरवून औरंगजेब १६८१-८२ सालात दक्षिणेत उतरला. औरंगजेबाला मराठय़ांनी सलग ८ वष्रे स्वराज्यातील एकही किल्ला जिंकू दिला नव्हता. मोगलांनी १६८९ साली दगा करून संभाजी महाराजांना संगमेश्वर मुक्कामी पकडून औरंगजेबाच्या हवाली तुळापूर येथे दिले. तिथे औरंगजेबाने त्यांचे हाल करून क्रूरपणे हत्या केली. याचा राजा असलेल्या संताजी, बहिर्जी, मालोजी घोरपडे आणि विठोजीने औरंगजेबाचा सूड घेण्याचे ठरवले. हे घोरपडे बंधू व विठोजीने निवडक १५० शिलेदारांसह तुळापूर मुक्कामी असलेल्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला, पण औरंगजेब त्याच्या तंबूत सापडला नाही. त्यामुळे चिडलेल्या संताजी व विठोबानी तंबूचे तणाव घाव घालून तोडले, तंबू खाली पडला तेव्हा त्यांच्या खांबावर असलेले दोन सोन्याचे कळस काढून घेतले. परतताना त्यांनी सिंहगडाचा पायथा गाठला. तिथे किल्लेदार असलेल्या सिद्धोजी गुजर यांनी या लष्कराची सर्व सोय केली..
त्याच वेळी मोगल सरदार झुल्फीकारखान कोकणातून लूट घेऊन पुण्यास जात असताना त्याच्यावर हल्ला करून घोरपडे बंधूंनी त्यांचा पराभव केला व सर्व खजिना लुटला आणि तीन हत्ती काबीज करून हे सर्व पन्हाळगडावर छ. राजाराम महाराजांना सादर केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महाराजांनी घोरपडे बंधूंना ‘ममलकतदार-ए-िहदूराव’ हा किताब दिला आणि विठोजीना ‘हिम्मतबहादर’ असा किताब, शिक्के व कटय़ार देऊन सन्मान केला. कर्नाटकात युद्ध सुरू असताना महानगर ऊर्फ बंगलोर इथे २२ मे १६९९ रोजी विठोजी मारला गेला. नंतर त्याचा पुत्र उदाजी याला राजाराम महाराजांनी हिम्मतबहादर पदाची वस्त्रे दिली. तालुका विजापूर व ठाणे मनगुत्ति वगैरे अठरा परगणे ,शिरोळ रायबाग वगैरे जहागिरी यांच्याकडे होत्या..
.
१७३२ रोजी सगुणाबाई निंबाळकर वहिदूराव घोरपडे यांना छत्रपती शाहूंची जी आज्ञापत्रे पाठविण्यात आली त्यात उदाजीरावांना ‘हिम्मतबहादर’ व ‘ममलकतदार’ असे दोन किताब लावलेले दिसतात. पैकी हिम्मतबहादर हा किताब जुना आहे. उदाजीही त्यांच्या पूर्वजाप्रमाणे पराक्रमी होते. शाहू आल्यावर ताराबाईंच्या पक्षात जाऊन ते बत्तीस शिराळ्यात गढी करून राहिले होते. उदाजी व दामाजी थोरात हे सातारा प्रांतापर्यंत स्वारी करत व चव्हाणचौथाई वसूल करत, गाव वसुल असा कार्यक्रम सुरूच होता. शत्रूच्या मुलखातून जबरदस्तीने चौथाई वसूल करण्याची मूळ कल्पना शिवाजी महाराजांची..! परंतु ही चौथाई प्रत्यक्ष स्वराज्यात उदाजीराव चव्हाण वसूल करत असल्याने त्याला कुचेष्टेने चव्हाण चौथाई असे नाव मिळाले होते, असे उल्लेख कागदपत्रात आहेत. याचा त्रास एवढा जाणवत होता की, त्या त्या प्रांतातील सरदारांनाही या अरिष्टनिवारणार्थ आपापल्या प्रजेवर ‘चव्हाणपट्टी’ असा एक स्वतंत्र कर लादला होता, आणि त्या पैशातून ते फौजा बाळगून उदाजीरावांशी लढा देत..
महाराणी ताराबाई राणी सरकार यांच्यातर्फे सेनापती चंद्रसेन जाधवराव यांच्या सोबत छत्रपती शाहू महाराजांशी यांनी लढा दिला, यांची गाधी बत्तीस-शिराळ्यास होती, शाहू महाराजांनी उदाजीरावास कैद केले होते परंतु वारणेच्या तहानुसार ते परत कोल्हापूरकर छत्रपती यांच्याकडे गेले. उदाजीरावांचे चुलते मालुजी चव्हाण यांना इ.स.१७३८ मध्ये डिग्रज हा सरंजाम म्हणून शाहूमहाराजांकडून मिळाला होता. शिवाय कर्नालपैकी निम्मा गाव त्यांना पालखीच्या खर्चासाठी शाहूंनी इ.स.१७४४ साली दिला होता. मिरज प्रांतापैकी फक्त हे दीड गाव आता या घराण्याकडे चालू राहिले..
.
हिम्मतबहाद्दर विठोजीराव चव्हाण यांना छत्रपती थोरले शाहु महाराज यांनी परळी ता बीड येथे देशमुखी दिलेली होती. त्यांचे वंशज परळी, वाला, हातोला व बिटरगाव येथे आहेत. ते आज चव्हाण देशमुख लावतात..
.
अशा या पराक्रमी उदाजीरावांचा मृत्यू नेमका कसा झाला याची खात्रीलायक माहिती नाही. मृत्यूबाबत पहिला उल्लेख कै. रथाजीराव चव्हाण यांनी आपल्या कैफियतीत यासंबंधी जो मजकूर लिहून ठेवला आहे त्यानुसार इ.स.१७६२ च्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या विरण्यात योद्धयाचा एका लढाईत अंत झाला. अक्कलकोटकर व हिम्मतबहादर यांचे एका हद्दीच्या गावाबद्दल कलह चालू होता. तेथे लढाई झाली त्यात उदाजीराव ठार झाले..
.
#रणमार्तंड_मराठे
———————————
🎨 @37omkar 👌🏼♥️🔥
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते; म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत रहायचे, यश नक्कीच मिळते.*_

*#हर_हर_महादेव 🙏🏻🚩*
🙏🚩दिनदुबळ्यांचा वाली तो,गरीबांचा कैवारी तो,ना धरतीचा ना स्वर्गाचा,तो रयतेचा राजा,भाग्य आमचे, लाभला आम्हा,असा शिवाजी राजा...🧡🙏
🧡अभिमानाचा दिन असणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. कामगारांच्या कष्टाला सलाम करण्याचाही हा दिवस आहे. कामगार एकजुटीचा विजय असो🌏🚩
🚩महाराष्ट्रदिन PK ग्राफिक्स
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक नवीन आव्हान उभे असते, त्यांचा सामना करावा लागतो.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
मराठी सुविचार संग्रह
Total Pages - 71
Price -
R̶s̶.̶9̶9̶.̶0̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह. (ebook)
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*अंथरूणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे..!*_

*#हर_हर_महादेव 🚩*
🚩🙏फक्त रयतेला केंद्रस्थानी मानून तिच्याच कल्याणार्थ निरपेक्ष भावनेने चालवलेले पृथ्वीतलावावरील एकमेव शासन म्हणजेच स्वराज्य होय...!!🧡🚩

जय_शिवराय 🙏🏻🚩
🙏जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते.अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐🙏🏻🙏🏻🚩🧡
2024/05/10 06:34:05
Back to Top
HTML Embed Code: