Telegram Group Search
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बुद्ध पोर्णिमा

भुगर्भात ईतिहाच्या तुच आहे बुद्धा
कणाकणात मातिच्या तुच आहे बुद्धा
जंन्म घेतो तूं रोज प्रखर सुर्या सारखा
पोर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश आहे तूं बुद्धा

हृदयात धरतीच्या तुच तर आहे
क्षितीजावर शांत बसून हसतो आहे
मानवतेला शांतीचा संदेश देतो आहे
माणसांना ,माणसाशी जोडतो आहे

तुझ्या पंचशिलेची गाथा करते मन शुद्ध
अंतरी क्रोधाचे शमते विनाशकारी युद्ध
"अत्त दिप भव, जीवन घडवतो आहे
भविष्यात न रमता वर्तमानात जगतो आहे

मार्गदाता तूं सम्यक बोधी विचारांचा
भयातून मृत्यूच्या सदा काढतो आहे
प्रेम करूणेची करून बंधुत्व पेरणी
ज्ञाणाचा दिव्य प्रकाश उगवतो आहे

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि .बुलढाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*युद्ध नको बुद्ध हवा*

सत्य शोधण्या निघाला
गौतम राजगृह सोडून
सामना अनंत यातनांशी
नाही पाहिले मागे वळून


जाणिले स्वानुभवाने
आहे मानवी देह नश्वर
सुखदुःख अनित्य सारे
पंचमहाभूत ते अनिश्वर


प्रतित्य समुत्पाद मांडले
सुखी करण्या मानवास
दश पारमिता निर्देशीली
त्यागण्या तृष्णा हव्यास


कास धरता तथागतांची
होई जीवन प्रगल्भ समृद्ध
जगी ओळख भारताची
शांतीदूत जगत् गुरु बुद्ध


*समता बंधुता प्रेम अहिंसा*
*शिकवण शाक्य बुद्धाची*
*मैत्रीभाव हृदयी जपता*
*निकड नुरे मानवा युद्धाची*

--------------------------------------
✍🏻 राजन जाधव
सिंधुदुर्ग
९७६३२०६७८२
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक जुन्या पुस्तकात ही कविता सापडली.वाचताना मजा वाटली म्हणून पाठवली.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नात्यांतील वास्तव

जखमांची कोल्हे कुही चालते
गर्द काळोख्या जिवघेण्या रात्री
संकटाची मानगुटीवर वेळ बसते
नेमकी तेव्हांच बसते खिशाला कात्री

कागदी नोटांचे रंग मागावे लागतात
तेव्हांच माणसांचे खरे चेहरे कळतात
रिकाम्या हातांनी माघारी फिरावे लागते
तेव्हांच नात्यातील खरे वास्तव कळतात

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलढाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पळून गेलेल्या मुली

कशा दिसतात
कशा हसतात
कशा बोलतात
नेमकं नांदतात तरी कशा…?
पळून गेलेल्या मुली

कुणीतरी म्हणतं मुलीला जन्म….डोक्याला ताप
लोकांच्या नजरेत उतरतो बाप
पण तरीही
बापाच्या काळजात घर करून असतात
पळून गेलेल्या मुली

आईच्या डोळ्यात आसवं होऊन दाटतात
घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात
आठवणी होऊन साठतात
त्या तिथं नसल्या तरीही असतात
पळून गेलेल्या मुली

कधी उठतात
कशा नटतात
कुणाला भेटतात
नेमकं रडतात तरी कशा…?
पळून गेलेल्या मुली

त्यासुद्धा माहेरच्या माणसाची वाट पाहतात
बाप समजून ढगाशी बोलतात
झाडाच्या सावलीत भावाला शोधतात
आणि,काळीज फुटून आल्यावर
आईची मांडी आठवतात
आतल्या आत हंबरडा फोडतात
पळून गेलेल्या मुली….

त्या पहिल्यासारखं रुसत असतील का..?
माहीत नाही
पण रुसवा काढणारा बाप मात्र आठवत असतील
पळून गेलेल्या मुली

पाणी भरतात
स्वयंपाक करतात
काही कामावर जातात
काही घरीच असतात
माहेरच्या आठवणीत नेमक्या
झोपतात तरी कशा…?
पळून गेलेल्या मुली

त्यांना भिंत तोडता आली नाही
म्हणून त्या ओलांडून गेल्या
पण खरंच त्या चुकल्या
की आपण चुकलो..?
अंधार झालेल्या व्यवस्थेत मात्र
आपण रक्ताच्या गोड नात्याला मुकलो
त्या पहाटेपासून रात्रीपर्यंत
उठल्यापासून झोपेपर्यंत
आपलं माहेर आठवत असतात
पळून गेलेल्या मुली

छोड दे यार ये बकवास बात
जाती धर्माने केला प्रेमाचा घात
द्या दणका उचला हात
लावा उजेडाच्या ज्योती
फोडून टाका या भिंती

डोळ्यात दाटलेल्या पाण्याला
काळजातल्या लेकीच्या गाण्याला
आता वाट मोकळी करून द्या
डोंगरासारखे हात पसरून उभे राहा
विजेसारखं कडकडून पोरीला आवाज द्या
त्या धावत येतील
रांगत येतील
माझं माहेर माझा बाप
असं जगाला सांगत येतील
मिठीमध्ये विरघळून जातील
तुडुंब भरलेल्या डोळ्यातून
नदिसारख्या वाहतील
शेवटी आपल्याच रक्ताच्या असतात नाही का..?
पळून गेलेल्या मुली…

दंगलकार नितीन चंदनशिवे
मु.पो.सांगली
कवठेमहांकाळ
7020909521

शेअर करू शकता
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❣️------- माझ कल्पनेपलीकडे गाव-----❣️


मलाही वाटायचं माझ्या कल्पनेपलीकडे एक गाव असावं..
त्या गावात माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासोबत माझ नाव असाव...

आयुष्याच एक वळण जिथ माझ कुणी ना उरावं...
इतक्या कामाच्या व्यापात अपेक्षा नव्हती कुणी मनी भरावं....


त्याल तु भेटलास जणु माझा स्वर्गात पाउल पडला... .
Social media च्या या जाळ्यात मला एक चांगला व्यक्ती घडला...

कधी कुणावर प्रेम न केलेली मी अचानक अचंबतच पडले ......
त्याच्याकडे बघुन जगु ढगांचया कुशीत दडले...

ना विचार एक ना धर्म ना जात....
तरीही लग्न करून सर्व गोष्टींवर केली आम्ही मात...

तो होता आयुष्यात आधीच एवढा होता आनंद ... ...
होता माझे पुरवीत सर्व लाड आणि सर्व छंद...

त्यात उगवला एक सोन्याचा दिवस छान होता तो काळ...
6 डिसेंबर रोजी आले आमच्या आयुष्यात एक गोंडस बाळ....

बाळाच्या जन्माच्या खुशीत जणु लख्ख फटाके फुटले..
त्या बाळाच्या स्वागतासाठी सारे देवही जागेवरुन उठले

• असे जन्मले माझे नटखट बाळ ठेवले शौर्य त्याचे नाव....
जणुकाही आता वाटत आहे झाले पूर्ण माझ्या कल्पनेपलीकडील गाव.....

__piyu❣️
.......... हरवलेला बाप........



शेतामधी माझी खोप तिला बोरट्याची झाप....
तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप...

बाबा आज तुमचा वाढदिवस तुमच्यासाठी किती आणि काय लाहु .....
सांगा ना बाबा आजच्या पावन दिनी देताल का गोड गोड खाऊ.....

करत आमच्या सर्व गरजा पूर्ण शरिरावरची फाटकी बनियान सुद्धा पाहिली नाही....
करत संसाराची जडणघडण एकत्र केल्या दिशा दाही.......

आमच्यावरचे प्रेम कधीच शब्दात व्यक्त नाही केले....
मग का बाबा? स्वतःच्या यातनांचे दुःख स्वतः एकट्यात वेचिले.....

पोरगी पायी चालत जाते म्हणून तिच्यासाठी गाडीचा थाट मांडलात....
गेले अर्ध्यावर आम्हाला सोडुन तेव्हा त्या देवाला का नाही भांडलात.....

Request करा ना त्या देवाला दोन मिनिट जाउन आलो खाली ..,...
सांगा ना त्याला माझ्याविना माझ्या लेकरांच नाही कुणी वाली...

पण त्या कठीण काळात मला चांगले-वाईट लोक फार कळाले ....
नंतर ते कितीही गोड बोलले तरी माझ्या स्वभावात नाही मिळाले.,..

बाकी काही नाही आईच्या म्हातारपणाचा आधार होतात तुम्ही.......
तुम्ही गेले जणु उन्हात उघडे पडलो आम्ही....

आज तुमचा खास दिवस खुप आठवण येते तुमची .....
निदान एखादं पत्र तरी लीहा आठवण काढुन आमची...

_piyu❣️____
♥️...............आई...............♥️


आई म्हणूनी कोनी आईस हाक मारी...!
आई या एकमेव शब्दासाठीच वेडी आहे दुनिया सारी....

आज तुझा वाढदिवस समजत नाही काय gift देऊ........
माझं अस्तित्वच तुझ्यामुळे आहे मग दुकानातील निष्फळ गोष्टी का घेऊ.....

बाबांचं छत्र हरवल तेव्हा माझ्याजागी तु मला धीर दिलास ....
सांगना गं आई माझ्यासाठी एवढा त्रास का साहिलास .....

जेव्हा समाज बोलला मोठी झाली टाका लग्न करून....
तेव्हा ती खंबीरपणे उभी राहिली तीचं सगळं दुःख सारून.....

MPSC च्या या स्पर्धाविश्र्वात जेव्हा अपयश मला हरवते ......
तेव्हा सांग ना ग आई तुच आयुष्याचा नवा धड़ा गिरवते ....

जेव्हा माझ अधिकारी व्हायचे स्वप्न जागेपणी ती जगते.... .
त्याक्षणी मी जिद्दीला पेटुन सांसारिक मोहमाया त्यागते.....!

एक सांग ना ग आई बाबा नसताना होत नाही का ग एकलेपणाचा आभास.....
तरिही तु शब्दाचीही तक्रार न करता लागू देत नाही तुझ्या दुखाची आस......

आजच्या दिवशी सांग काय करु तुजसाठी......
जेणेकरुन तुझा हात राहिल नेहमी माझ्या पाठी.....

माझी लेखणी आधुरी पडते जे जेव्हा लिहायला तुझ्या विषय घेते...
खरंच सांगू का ग आई बाबांचीही खुप आठवण येते......

___piyu--❣️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2024/06/17 05:04:58
Back to Top
HTML Embed Code: