Telegram Group Search
Photo from vikas sukhadhane
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भिमराया

हे भिमराया तू होतास म्हणून
माणूस आज माणसात आहे
गुलामिच्या तोडून सार्‍या शृंखला
नांदतो आज लोकशाहीत आहे

हे भिमराया तू होतास म्हणून
माय ,बहीण आज ऑफिसात आहे
मुलभूत अधिकार देवून घटनेत सारे
देशाची राष्ट्रपती आज महिला आहे

हे भिमराया तू होतास म्हणून
मुक्या प्राण्यांना मिळतो न्याय आहे
हे भिमराया तू होतास म्हणून
आज मिळतो हा मान सन्मान आहे

विकास सुखधाने
युवा साहित्यिक, लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
संगीत

दंश फुलांनी मज असे केले होते
सुगंध म्हणून मज विष पाजले होते

जो भेटला त्याने असे वचन दिले होते
पहीला वारं मीच करेन असे म्हणले होते

केले ना कोणावरही प्रेम तीने सांगितले होते
तिच्याच प्रेमाचे चाहते शेवटी हजार होते

नाही मागे वळून पाहणार मी ठरवले होते
संगीत दुःखाचे रस्त्यावर मागे वाजतं होते

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलढाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तूं कुण्या कविच्या प्रेमांत पडू नये

असे अघटित कधीचं
कुणा सोबत घडू नये
कधीचं तूं कुण्या कविच्या
प्रेमांत पडू नये

              तुला पाहून त्याने
              कविता लिहू नये
              भोळे भाबडे आयुष्य
              त्याचे बरबाद होऊ नये

आवर स्वतःला अनं
कुणाला बोलू नकोस 
कुण्या कविच्या शब्दांवर
तूं वाह ,वाह म्हणू नकोस

                अडकवू नको बये
                जाळ्यात तुझ्या प्रेमाच्या
                ईतके व्हावे शेवटी बस
                त्याने तुझ्याकडे भिक मागू नये

आणाभाका त्याला तूं
देऊ नकोस सुरवातीला
बोलले मी तूं प्रेम समजून
बसला असे तूं म्हणू‌ नये

                      जीवघेणा प्रकार हा
                      जरी तुझा छंद असला
                      कधीचं कुणावर रडण्याची
                      मग ही वेळ येऊ नये

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जी. बुलढाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शोध माझाच मला

सुचत नाहीत शब्दं मला
आता बर्‍याच दिवसांपासून
हसल्या नाहीत जखमा
आता बर्‍याच दिवसांपासून

ओठांवर तरळत नाहीत
आता चारोळ्या मखमली
मारल्या नाही हाका सखीला
आता बर्‍याच दिवसांपासून

ओवाळून घेतं होतो मी
काळजातल्या जखमांना
वेदने सोबत रडलो नाही मी
आता बर्‍याच दिवसांपासून

माझी दृष्ट काढत होती
माझ्या अंगणातली रांगोळी
पाहीले नाही आरशात मी मला
आता बर्‍याच दिवसांपासून

उगवणारा दिवस रोज विचारतो
मला माझी खुशाली
बोललो नाही राञीला मी
आता बर्‍याच दिवसांपासून

✍️विकास सुखधाने
युवा साहित्यक लेखक
नांद्रा ता.मेहकर जि.बुलढाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*कडक कविता कोणाची माहिती नाही, पण कमी शब्दात खुप काही सांगून जाते*

नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!! 😆

*वीज* कधी वाचवणार नाही
*बील* मात्र *माफ* पाहिजे....!!!! 😆

*झाड* एकही लावणार नाही
*पाऊस* मात्र चांगला पाहिजे....!!!! 😆

*तक्रार* कधी करणार नाही
*कारवाई* मात्र लगेच पाहिजे....!!!! 😆

*लाचेशिवाय* काम करणार नाही
*भ्रष्टाचाराचा* मात्र *अंत* पाहिजे....!!!! 😆

*कचरा* खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र *स्वच्छता* पाहिजे....!!!! 😆

कामात भले *टाईमपास* करीन
दर वर्षी नवा *वेतन आयोग* पाहिजे....!!!! 😆

*जातीच्या* नावाने *सवलती* घेईन
देश मात्र *धर्मनिरपेक्ष* पाहिजे....!!!! 😆

मतदान करताना *जात* पाहीन
*जातीयता मात्र बंद* झाली पाहिजे....!!!! 😆

*कर* भरताना पळवाटा शोधीन
*विकास* मात्र जोरात झाला पाहिजे....!!!! 😆

नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे.! 🤔

🙏🇮🇳🙏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ❤️📚🎊

सौमित्र लिखित " बाऊल " ह्या कविता संग्रहातून❤️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2024/04/28 04:50:48
Back to Top
HTML Embed Code: