Telegram Group Search
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्मरण महामानवाचे ✍️
भीमसुर्य मावळता झाली ' धरती सुनी सुनी ।
निळ्या सागराचे पाणी ' रडे धाय मोकलूनी॥

काळरातीने कसा अचानक ' घातला तो घाला !
कोटीकोटीचा प्राण क्षणात एका ' हिरावून नेला ।
झंझावात शांत झाला बुद्धचरणी लीन होऊनी॥
निळ्या सागराचे पाणी....

निर्वाणाची ऐकुण वार्ता चवदार तळही रडले !
म्हणे मुक्त करण्या माझे पाणी भीमबाबा ते लढले ।
व्याकुळ होई तळे अजुनी ' भीमस्पर्श तो आठवूनी॥
निळ्या सागराचे पाणी....

राजा दिनांचा कसा विसावला ' त्या चैत्यभूमिवरि !
अभिवादना आकाशही झुकले ' खाली धरणीवरि ।
जनसागराच्या हुंदक्यांनी आसमंत गेला गलबलूनी॥
निळ्या सागराचे पाणी....

युगायुगातुनी जन्म घेति युगपुरुष या धरतिवरि !
बुद्धरूप घेवूनी ज्ञानसुर्य तो प्रकाशला अवनिवरि ।
ज्ञानप्रकाशाने रानमाळी या गेला वसंत फुलवूनी॥
निळ्या सागराचे पाणी....

विद्वत्तेचा महामेरू होता तो ज्ञानियांचा राजा !
विद्वान भीमासारखा नाही झाला कोणी दुजा ।
अभिवादन करुया युगंधराला नतमस्तक होऊनी॥
निळ्या सागराचे पाणी रडे धाय मोकलूनी....

🌹नमोबुद्धाय 🌹
🌹जयभीम 🌹
🙏🙏🙏

✍️ एस . पी . धनेश्वर सर .
@klakavy
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

तूच सांग आयुष्या मी कसं वागावं


समजून जगावं की जगून समजावं
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं

जुने अनुभव गाठीला घेत
नव्या अनुभवांना वेचावं
की कडू गोड क्षणांना वळचणीला टाकावं
की जुन्या नव्याची सांगड घालत आल्या क्षणाला जगावं
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं

स्वतःशी प्रामाणिक राहावं की इतरांचं मन सांभाळावं
दुसऱ्याच्या मर्जीने वागावं तर स्वतःच्या वाटण्याचं काय करावं
की जे मनापासून वाटलं त्याच्या मागे जावं
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं

कोण आहे मी, एक स्वतंत्र अस्तित्व
की फक्त इतरांनी घडवलेलं एक व्यक्तिमत्त्व
असाव्यात का स्वतःच्या व्याख्या माझ्या आयुष्याला
की काहीच अर्थ नाही मनापासूनच्या जगण्याला
की फक्त इतरांच्या अपेक्षापूर्तीचं साधन व्हावं

समजून जगावं की जगून समजावं
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं



✒️सचिन सवाई
@klakavy

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷गोंडस सत्य..!!🌷🌷🌷

तुम्हाला विचारण्याची गरज पडत नाही.

कारण

लोकांच्या डोक्यात घट्ट बसलेल्या असतात,

आपल्याविषयी इतरांनी सांगितलेल्या बाबी.

📖📖🌷🌷🧫🧫🍃🍃💍💍
©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677

@klakavy
🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️ 🖋️🖋️ 🖋️🖋️🖋️🖋️🖋️

*आयुष्य खूप सुंदर आहे*


आयुष्य खूप सुंदर आहे
तुलना सोडली तर,
समाधान निवडलं तर।
खरचं आयुष्य खूप सुंदर आहे
थोडं मनापासून जगलं तर।।

आयुष्य खूप सुंदर आहे
समजूतीने घेतलं तर,
हूशारीने वागलं तर।
खरचं आयुष्य खूप सुंदर आहे
थोडं निवांत जगलं तर।।

आयुष्य खूप सुंदर आहे
सहजतेने घेतलं तर,
प्रामाणिकपणे जगलं तर।
खरचं आयुष्य खूप सुंदर आहे
स्वतः ला आहे तसं स्वीकारलं ।।
                              



~सचिन सवाई
@klakavy
🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️ 🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️
❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️

कुणी कसं जगायचं हे
इतरांनी कसं ठरवावं
आपण बरोबर की चूक
हे ज्याचं त्याने पहावं

नसतो कुणीच कधीच
नेहेमी चूक किंवा बरोबर
मर्यादा असतात प्रत्येकाला
एक माणूस म्हणून पहावं

टोकाच्या भूमिकेचा त्रास
स्वतःलाच जास्त होतो
शक्यतो शक्य असेल तर
टोकाला जाणं टाळावं

मिळतो क्षणिक आनंद
तात्पुरते समाधानही
पण दुखावली जातात मनं
रागाला जरा आवरावं

असतात भावना प्रत्येकाला
ईच्छा, अपेक्षाही असतात
स्वतः पाहिजे तसं वागतांना
इतरांनाही वागू द्यावं

प्रत्येकजण चुकतो,
कुणी त्यातून शिकतो,
कुणी पुन्हा चुकतो
कधी शिकता शिकता चुकावं
कधी चुकता चुकता शिकावं



✒️सचिन सवाई
@klakavy

❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️❕️
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

आज झाले 22 पूर्ण


आज झाले 22 पूर्ण...
पाहिलेले स्वप्न सारे
अजूनही आहेत अपूर्ण...
अजूनही आहेत अपूर्ण...

कष्टातच चाललय
आई वडिलांचं आयुष्य संपूर्ण...
ते आता थांबवायचं होतं
आधार बनून त्यांचा
जीवन जगणे शिकवायच होतं
माझे तर झालेत आनंदात 22 पूर्ण...
पण त्यांच्या साऱ्या अपेक्षा
अजूनही आहेत अपूर्ण...

आईला मला पाहायचं आहे
बनलेला मी गरिबांसाठींचा कर्ण...
माझे तर झाले किती लवकर 22 पूर्ण
पण
आईचे ते स्वप्न मात्र आजुन अपूर्ण...
अजूनही आहे अपूर्ण...
अजूनही आहे अपूर्ण...

मित्रही म्हणतायत
कधी करशील अधिकारी होऊन
आम्हाला तू फोन...
कान आतुर आहेत आमचे
तुझे ते शब्द ऐकायला दोन....
करेन लवकरच म्हणत म्हणत
माझे तर झाले 22 पूर्ण
पण,
तुमचे ते स्वप्न अजूनही आहे अपूर्ण
अजूनही आहे अपूर्ण...

एक तीपण आहे
वाट बघत बसलेली
कधी येऊन घरच्यांना हात मागेल
म्हणून माझ्यावर रुसलेली
वर्ष तर किती लावकर
होत आहेत पूर्ण....
लग्नासाठी विचारायला
कस संभाळशील तिला?
या प्रश्नाचं उत्तर
अजूनही आहे माझं अपूर्ण...
माझे तर झाल आज 22 पूर्ण...


विश्वास ठेवा
प्रयत्न मी करतो आहे
प्रत्येकाच्या प्रेमाची
जानं मी ठेवतो आहे
आहे परिस्थिती थोडी अवजड
म्हणूनच आहेत सर्वांच्या अपेक्षा अपूर्ण...
फक्त थोडासा वेळ द्या मला
करेन मी नक्की प्रत्येकाचेच स्वप्न पूर्ण...


✒️कवी :- अक्षय कदम
9370209125
@klakavy

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
चिमुकली ती पाखरे
अंगणात चिवचिव करी
दाणे टिप टिपतांना
रांगोळी रेखाटता दारी...

परमेश्वरांची लिला
पंखात त्यास बळ देई
उंच उंच झेप घेण्या
नभातकडे धाव घेई...

आपल्या मुलांचेही
असेच असते जीवन
उच्चशिक्षित झाल्यावर
परदेशात जाई निघून...

सातासमुद्रां पलीकडे
अस्तित्व निर्माण करता
ध्येय साधना करून
आयुष्य त्यांचे घडवता...

चिमुकली बाळ कधी
मोठे होऊन जातात
आईवडिलांच्या कष्टाची
आठवण मनी जपतात...


💞गायत्री💞

@klakavy
*वाट*

वाट पाहते सख्या
येणार आज घरी
कोवळे क्षण सारे
पाहते बघ दारी...॥

मोकळी कुंतलेही
वा-यासवे विहरती
तुझ्या वाटेने कशी
हळूहळू डोकावती...॥

कमळ पाकळीही
आनंदाने उमलली
हिरव्या पानांमधून
डौलदार फुललेली...॥

स्वच्छ नितळ झरा
स्वरगाण गुणगुणतो
अवतीभोवती कसा
झुळझुळ मंद वाहतो...॥

अबोल ओठांवरील
शब्द काही पुटपुटले
मनातले भावस्पर्श
शब्द बाहेर विहरले...॥

*सौ गायत्री सोनजे,नाशिक*

@klakavy
सततच्या पेपरफुटीमुळे त्रस्त असलेल्या विध्यार्थ्यांची व्यथा कवितेतून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न....

🌷कविता :- कुंपणच शेताला खाते 🌷

मोठं व्हावं, ध्येय गाठावे
आईबाबाचे स्वप्न पूर्ण करावे
मनीषा मनातच राहते
आमच्या स्वप्नाची राखरांगोळी होते
काय करावे... इथे....कुंपणच शेताला खाते

रात्रभर पुस्तकात डोकं रुतवून
आम्ही डोळे फोडून घ्यावे
कित्येक मने करपून निघते जेव्हा
परीक्षेच्या ऐनवेळी पेपर फुटल्याचे कळते

आमच्या स्वप्नाची तर राखरांगोळी होते
काय करावे.... इथे... कुंपणच शेताला खाते


विश्वासाचा सौदा झाला
किंमत लाखात ठरली
अभ्यासू विध्यार्थी डावलून
मोठ्या वळुंनी पैशानं बैलं भरली

लाच घेऊन पेपर फुटते
शासन मात्र शेवटपर्यंत झोपी जाते
सगळे ढोंगी,सांगावी कुणा व्यथा
आमच्या स्वप्नाची तर राखरांगोळी होते
काय करावे....इथे... कुंपणच शेताला खाते


जनतेच्या विश्वासाला
सर्रासपणे गहाण ठेवले जाते
लाज वाटत नाही यांना,
शासन गलेलठ्ठ पगार देते
आमच्या स्वप्नाची तर राखरांगोळी होते
काय करावे... इथे.....कुंपणच शेताला खाते

काही सजग लोकांमुळे
प्रकरण उघडकीस येतो
थोडा कां होईना तेव्हा
मनाला दिलासा मिळतो

एकच इच्छा कठोर शिक्षा व्हावी
चार चौघात यांची धिंड निघावी
कष्टाळू विध्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे,
आम्हाला योग्य न्याय मिळावे
यापुढे....असे करण्या... कुणी न धजावे


📖📖📖📖📖📖📖📖📖
©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677

@klakavy
संकल्प म्हणजे काय...?

पिस्टन सिलिंडर सदैव्य साथ राहून काम करणे म्हणजे संकल्प....

कॉलम बीम सारखं सगळ्यांना आधार देणे म्हणजे संकल्प...

नट बोल्ट सारखं एकमेकांना जोडून ठेवणे म्हणजे संकल्प...

गिअर सारखं आपल्या जीवनात यशाची गती वाढवणे म्हणजे संकल्प...

बॅटरी सारखं दुसऱ्यांना अंधारातून प्रकाशाकडे आणणे म्हणजे संकल्प...

इंडिकेटर सारखं चुकीच्या माणसाला योग्य दिशा दाखवणे म्हणजे संकल्प...

स्पार्क प्लग सारखं स्वतः मध्ये ज्ञानाचा प्रकाश पेटवणे म्हणजे संकल्प...

वेल्डिंग रॉड सारखं स्वतः जाळून दुसऱ्यांचा चांगला कसा करतो येतो याच विचार करणे म्हणजे संकल्प...

एक्झॉस्ट स्ट्रोक सारखं मनातील वाईट विचारांना बाहेर टाकून नवीन विचारांना आत्मसात करणे म्हणजे संकल्प...

सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..........
........................................................................
धन्यवाद!


                       ✒️सागर आष्टगी.......

@klakavy
प्रेम


प्रेमाला कुणी शब्दांत
कसे व्यक्त करावें,
अनंताला बांधण्याचे सामर्थ्य
शब्दांत कुठून यावे।
प्रेम खरंतर आपण फक्त अनुभवावे,
सर्व स्वार्थ सोडून
त्यात स्वतःला विरघळून द्यावे।।

ठरवून कुणी करावे
इतके संकुचित ते नसावे,
आपल्याला कधी फुलायचंय
हे फुलाने कसे ठरवावे।
उमललेल्या फुलापासून
भ्रमराने तरी स्वतःला का सावरावे,
माणसालाही कुणीतरी सांगावे
प्रेम हे असेच असावें।।

कुठल्याही एका नात्यामध्ये
प्रेमाला का जखडावे,
त्याचे अनंत अविष्कार पाहायला
हे आयुष्यही अपुरे पडावे।
ज्याला हे कळाले
त्याने स्वतःला भाग्यवान समजावे,
प्रार्थना फक्त एकच
हे भाग्य सर्वांन मिळावे।।

                                



✒️सचिन सवाई

@klakavy
सरते वर्ष...

बघता बघता आज
हेही वर्ष सरलं
मागे वळून पाहताना
कुठे काय उरलं?

अहो वर्ष ते सरणारच
कटू गोड आठवणी
आता मागे उरणारच

भरल्या डोळ्यांनी पाहून
त्यांना रीते करावे
जगण्याची उमेद घेऊन
स्वप्नं जीते भरावे

हिशोब नका लावू आता
घडलेल्या रणांचा
घेऊ नका मागोवा
रडलेल्या क्षणांचा

प्रकाशाच्या मागे मागे
पावलं टाकत जावे
सांजवेळी घ्यावा आसरा
काहीकाळ निजावे

पुन्हा दिवे वर्ष नवे
प्रकाशमान होईल
संकल्प नवे प्रयत्नांसवे
विक्रम मोडीत जाईल

हा खेळ आयुष्याचा
कोणा चुकला आहे?
जमलं ज्याचं संघर्षाशी
तोच टिकला आहे.

कवी/लेखक
सुमेध मधुकर सोनावणे
9967162063

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌷🎇🌷🎇🌷🎇

@klakavy
दि.२/०७/२०२१
" प्रेम "
शिर्षक :- आधार तुझा होता
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
मन आहे ते मलाही
किती जपाव्या भावना
मन अधीर झालेरे
हृदयाच्या संवेदना .....
प्रेम तुझ्यावर केले
कर साजना विचार
कर्तव्यच ओझ झालं
नाही कुणाचा आधार .....
साथ जीवनात तुझी
मिळायला हवी होती
आयुष्याच्या वाटेवर
जपू नव्याने ती नाती .....
होता तुझाच आधार
नांव हृदयी कोरले
येणा सोबतीला माझ्या
कोणी तुलारे हेरले.....
नको परीक्षा आताही
सख्या मनाने खचले
जीवनाचा जोडीदार
मनी‌ तुलाच वरले.....

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

✒️ श्री. दिलीप काळे, परसापूर (जि.अमरावती)
८९९९५१८६२७
@klakavy
चूल अन मुल या चौकटाबाहेर स्त्रीयाचे जग नव्हते, माझ्या माईने उंबरठा ओलांडून 1 जानेवारी 1848 ला पुण्यात भिडेवाड्यात स्त्रीशिक्षणास सुरवात केली. हे आज आपण ज्या सहजतेने बोलून जातो ना,कदाचित एव्हडं सोप्प असतं तर,
उच्च शिक्षणासाठी मुलीने मोठ्या शहरात एकटी जावं यासाठी आज घरातील कुणा एका सदस्यांनी जरी विरोध केला तर आपण आपला निर्णय बदलून टाकतो,माईला तर साऱ्या समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागले, त्यावेळी त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल यांची कल्पनाच करवत नाही..
जयंतीदिनी माई साऊचरणी विनम्र अभिवादन...
🌷🌷🌷🙏🙏🙏
©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
@klakavy
|| क्रांतीज्योती ||

स्त्री-शिक्षणाचा दावी मार्ग
क्रांतीज्योती सावित्रीबाई
शिक्षणाची घेऊन मशाल
विरोधकांशी केली लढाई ||

ज्ञानाच्या पेटवून ज्योती
काढली मुलींची शाळा
शिक्षणाच्या प्रसारासाठी
क्रूररुढींना घातला आळा ||

ज्योतिबाची घेऊन साथ
विधवांची झाली सावली
दुष्काळात सावित्रीबाई
अनाथांची झाली माऊली ||

विरोधी सनातन्यांनी
अंगावरती फेकले शेण
अनेकांशी करून संघर्ष
दिले मिळून स्त्रीयांना स्थान ||

कष्ट करून त्रास सोसुनी
फळा आली तुझी पुण्याई
अंगावरती झेलून गोटे
नाही डगली सावित्रीबाई ||


✒️कवी : विजय सानप
औरंगाबाद : ९४२२२५९६९६
@klakavy
लढायचे आहे बेरोजगारीशी.……



शाळा म्हणजे विद्यामंदिर आहे
त्यास अपवित्र कधी करू नको
मादक पदार्थ सेवन करून मित्रा
वाट शाळेची कधी तू धरू नको

हाती असू दे लेखणीस तुझ्या रे
मावा मळत बस स्टँड राखू नको
शिक्षकांच्या खोड्या काढत कधी
अधर्माचे कटू फळे तू चाखू नको

नाकर्तेपणा येईल तुला तू जर का
ध्येयवादी आत्ताच नाही बनशील
वाचनात मन रमविलेच नाही तर
ध्येयास तुझ्या तू कसा गाठशील?

शांत बसून काही फायदाच नाही
तुला लढायचे आहे बेरोजगारीशी
कष्ट करताना तुला लाजयचे नाही
प्रामाणिक रहायचे नित्य मातीशी

कसशील तरच तू इथे रे टिकशील
नाहीतर उपासमार नित्य साहशील
जिंकण्याची तयारी नित्य करताना
शिखरे गाठताना स्वतःस पाहशील


©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
@klakavy
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

काय हरकत आहे

करतोच आहेस जर सगळं तर
व्यवस्थित करायला काय हरकत आहे
स्वतःच्या आयुष्याची जिम्मेदारी
स्वतः घ्यायला काय हरकत आहे

का नाकारतोस परिस्थितीला
ती मान्य असायला काय हरकत आहे
हवा असेल काही बदल तर
प्रयत्न करायला काय हरकत आहे

गरज नसतांना जर अडकवतो स्वतःला
तर मोकळं होण्याला काय हरकत आहे
का शोधतो विनाकारण दुःख
आनंदी जगायला काय हरकत आहे



✒️सचिन सवाई

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@klakavy
2024/04/29 18:20:13
Back to Top
HTML Embed Code: