बाप

व्यथेची कथा ,कथेचा सार
बापाच्या जीवाला कष्ट अपार ...!

आभाळाचा गंध ,मनी आनंद
तृषीत मनाला मातीचा सुगंध...!!

घराचं आडं हाडांची काडं
सरकारी त्याला बंद कवाडं ...!

उभी जिंदगी बाप कर्जात बुडाला
आयुष्यात अंती लटकून मेला..!!

सुखाची सावली मायचा पदर
खिल्लारी जोडी बापाचा आधार...!

खांद्याला खांदा कोण ‌देई साथ
स्वार्थी जगाची कशी रीतभात.....,!!

आषाढी कार्तिकी पंढरीची वारी
माझ्या बापाची गोष्टच न्यारी ...!

विठ्ठल पाहिला,शेतात उभा
घामाच्या धारा झाली चंद्रभागा...!!

कष्टाला बापाच्या नाही गड्या तोड
झुकला ना कधी राहीला अजोड ..!

बाप माझा सदा कष्टाचाच धनी
कशी मांडू त्याची करुण कहाणी ?....!!

✒️✒️
* *सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
* *कर्ण सखा ९०२२६२२८५६*
*माझी मराठी*

माय माझी मराठी
शब्दांचा झरा
साधु संतांच्या मुखातून
वाहतो झरा झरा

माय माझी मराठी
जणू शब्दांची खाण
धन संपदा साहित्याची
नाही कशाची वाण

माय माझी मराठी
कंठी मोत्यांचा साज
शोभून दिसतो भाषेचा
जसा शिरपेचा ताज

माय माझ्या मराठीत
नाही कशाची उणीव
पदोपदी देते करुन
परोपकाराची जाणीव

माय माझी मराठी
भरले अमृताचे शीके
आजीवन अमरत्वाने
थोरवी शब्दांची जिंके

माय माझी मराठी
आहे आठवण मनात
जयंती तात्या साहेबांची
ठेवतो प्रत्येक काळजात

✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*कर्ण सखा ९०२२६२२८५७*
प्रश्न जर आवडीचा असेल
तर निवड महत्त्वाची आहे
मन कोणाचं समजायला
सवड ही महत्त्वाची आहे ...!!

असं नाही की प्रेम फक्त
चेहरा पाहून होतं
नजरेची भाषा जर कळली
तर नजरेतूनच होतं ...!!

होती खुप स्वप्न तुझी
असतील ही खुप अपेक्षा
गरजेनुसार जगावं आपण
होत नाही कधीच उपेक्षा ...!!

प्रेमानं जग जिंकता येत
म्हणणं किती सोपे आहे
काहीच मिळत नाही सहज येथे
जीवन खुप अवघड आहे ...!!

तुझ्या माझ्या प्रेमाची थोडी
गोष्टच निराळी होती
सत्य तुला सांगताना माझी
भावना मात्र जळाली होती.....!!

सर्व सोडून आपण सखे
पुन्हा त्याच वाटेवर आलो
प्रश्न आयुष्याचे सोडवता सोडवता
आपणच प्रश्न होऊन गेलो ....!!

सुटणार नाहीत कोडे हे
जीवन म्हणजे जंजाळ आहे
आवडी निवडी चे सोड आता
प्रेम म्हणजे माया जाल आहे...!!

✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*कर्ण सखा ९०२२६२२८५७*
*माय मराठी*

शब्दांचा साज आमचा मराठी बाणा
भाषेचा ताज आमचा मराठी बाणा ..!!

तळपती तलवार आमचा मराठी बाणा
छत्रपतीची ललकार आमचा मराठी बाणा...!!

चैतन्याचा खाण आमचा मराठी बाणा
भक्तीची शान आमचा मराठी बाणा ...!!

श्रध्देचा ठेवा आमचा मराठी बाणा
आईवडिलांची सेवा आमचा मराठी बाणा ...!!

कर्तव्याची जाण आमचा मराठी बाणा
जीवाचे रान आमचा मराठी बाणा ...!!

शौर्याची गाथा आमचा मराठी बाणा
विसरतो व्यथा आमचा मराठी बाणा ...!!

आपुलकीचा ठेवा आमचा मराठी बाणा
परोपकाराचा हेवा आमचा मराठी बाणा ...!!

शब्दांची धार आमचा मराठी बाणा
कवितेचा सार आमचा मराठी बाणा...!!

✒️✒️

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*कर्ण सखा ९०२२६२२८५७*
*मौनाची भाषा*

मौनांच्या शब्दांचे अर्थ समजून घे ...!
भावनांचे अर्थ थोडे उलघडून घे ...!!

काय आहे जगणे कळले ना तुला ..!
आपल्या मिलनाचे अर्थ समजून घे ...!!

मिळतो ना आनंद दोन क्षण भेटीचा ...!
आजन्म सोबतीचा अर्थ तू उकलून घे ...!!

प्रेम माया ममता जगण्याचा ध्यास आहे ..!
विसणा-या प्रसंगाचे गांभीर्य जाणुन घे ..!!

काय मिळाले तुला सहवासात राहून..!
दुराव्याचे कारण तू मनात ठरवून घे ..!!

भेटून न भेटणे वेळेचे नियोजन आहे ..!
भेटीत काय बोलायचे ते लिहून घे ..!!

शब्दांची किमया कुठे जमते प्रत्येकाला ...!
मनातली सल एकदा तरी बोलून घे...!!

जीवन दोन क्षणाचे आनंदने जगायचे ..!
दुःखाचे ओझे इथेच हलके करून घे ..!!

✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*कर्ण सखा ९०२२६२२८५६*
*श्री स्वामी समर्थ*
आपली फक्त जबरदस्त निष्ठा *गुरुवर्य परम पूज्य गुरुमाऊलींच्या चरणी* असावी, कोणी नाही जेष्ठ, कोणी नाही कनिष्ठ, दिंडोरी सेवा मार्गाशी जो राहील एकनिष्ठ, तोच ठरणार सर्वात श्रेष्ठ.

🚩 *श्री स्वामी समर्थ गुरुमाउली*🚩
https://www.instagram.com/reel/C3wR51Eo0zy/?igsh=c2t5dndnaHFiMmZt
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
*✍️ स्वरचित मधुर वाणी क्र.१०४६✍️*

*प्रत्येकाच्या खंत असते जीवनात*
*करायचे असते काही निराळे*
*पण जगायचेच राहून जाते*
*अन् मार्ग मिळत जातात वेगळे*

*जरी मिळाला मार्ग वेगळा*
*संधी चे ते करावे सोने*
*क्षण क्षण वेचून आयुष्याचा*
*राहिल मग काय उणे*

*सौ माधुरी नामदेव अमृतकार सटाणा, नासिक*
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
*कविता*

कविता माझी अशी मुक्तपणे विहरावी
स्वच्छंदपणे फुलताना सुगंधा परि दरवळवी...!!
 
कविता माझी दर्पणा परि असावी
शास्वत नाते जपताना डोळ्यातूनी व्यक्त व्हावी...!!
 
कवितेत माझ्या नसावा शब्दांचा खेळ
त्या पल्याडही व्हावा भावार्थाचा मेळ ...!!
 
कविता माझी व्हावी सुखदुःखाचे गाणे
मंजुळ सुरांचे व्हावे अविट तराणे .....!!

कवितेने माझ्या जपावे नाते माणुसकीचे
शब्दा शब्दात असावे भाव आपुलकीचे ...!!

कविता म्हणजे नसावी ओळ अलंकारांची
कवितेने जपावी ढृड ओढ नात्याची ....!!

✒️✒️

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*९०२२६२२८५६*
 
*वेध*

वेध मला माझ्याच जगण्याचे लागले
तुझी वेद पुराणे वाचुन पोट नाही भरले...!!

भुक झाली बंदिस्त,पोटात माझ्या
पीळ जळला अजुनही वळ नाही सरले....!!

धुंद झाले नेते मदमस्त हत्ती सारखे
उध्वस्त झालेल्या वस्तीचे ,ते गुन्हेगार नाही ठरले...!!

जळुन खाक झाली, स्वप्ने झोपडीतली
जळाली मने निखा-यात ,मागे काही नाही उरले ...!!

आनंद वाटता वाटता जिंदगी सरली
वाळवंटी आयुष्यात अश्रूंचे थेंब नाही पडले ....!!

एक रोपटे आशेचे मीही लावुन पाहतो
घेईल भविष्य निवारा अमर कोणीच नाही उरले ....!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*९०२२६२२८५६*
*गीरते आंसु को रोके तो जाने!**
रोशनी में जो ठहरे हुये हैं
युं तो शिशे भी लगते नगीने।
छोडदो रोशनी का वो दामन
अंधेरो में भी चमको तो जाने।।
फुल पौधे वहां ना लगाओ
जीस जमीं पर हैं गुलशन सदीसे।
बहुत बाकी हैं बंजर जमीं
तुम एक पौधा उगाओ तो जाने ।।
जीये सौ साल कहने लगे वो
सारी दुनिया को देखा हैं हमने।
कौनसा तीर मारा हैं जीकर
देखे दुनिया तुम्हे भी तो जाने।।
कोई रोता हैं तो साथ उसके
रोते देखे हैं अपने पराये।
चाहे रो ले या मत रो मधु तु
गीरते आंसु को रोके तो जाने।।
एम एल गोपनारायण
*उपेक्षिताचे जीवन**
गेलं आटुनं डोळ्याचं पाणी
जीव झाला हा केवीलवाणी
रस्त्या कडेला संसार थाटला
पुरी घडते इथे जिंदगानी

रात्री पाठीला उघडी धरती
डोई उषाला दगड घेती
गाढ निवांत झोपुन जाती
चिंता उद्याची ना भविष्य भीती

पोट भरेल असे तीथे गांवं
आवडी निवडीला इथे ना वावं
असे गाठीला तेच घ्यावं
वस्त्र अंगाला मीळे ते ल्यावं

जाती धर्मासी नसे नातं गोतं
माणसा माणसासी माणसाचं नातं
छोट्या लोकांचं विश्व हे छोटं
दुनियादारी दुर दोनं हातं
मधुकर गोपनारायण
कविता
दि .२२ / ०४ / २०२४
शीर्षक : भारताचा पाया

भारताचा पाया
माझा भीमराया
घटनातज्ञ शिल्पकार
त्यांची सदैव छाया ....१

कायदामंत्री देशाचा
धगधगता अंगार
समाजाचा आधार
अन्यायावर करे प्रहार ....२

भीमराव आंबेडकर
एकच घटनाकार
अनंत विश्वात गाजला
सारेच करती स्वीकार ....३

भीमराव एकच झाला
असा नाही कुणी पाहिला
समाजासाठी फक्त झिजला
कधीच मागे ना सरला ....४

समतेचा सूर्य उगवला
प्रकाश दारी आला
मन असे आनंदले
भीम कधीच नाही हारला ..... ५

कवी - प्रा .पी.एस़ बनसोडे सर
लातूर ८३९०३६३२६५
*आजची चारोळी*"
,*(१)*
निवडणुकीचे वादळ सुटले चौखूर उधळले घोडे
डोळे आपुले जरा जपुन ठेवा होऊ नका आंधळे
आमिषाचे डोस देत जो तो येईल बरळुन जाईल
मधाच्या बोटा भाळु नका असे चकव्याचे ते जाळे
*(२)*
याचेही ऐका त्याचेही ऐका भाव कुणा देऊ नका
विवेक आपला जागे ठेवूनी उचीत तया देऊ मोका
आचार करावा ऐसा की त्याचा पश्चात्ताप ना व्हावा
ठोक्या ठोक्यावर लक्ष असो चुकु नका देऊ ठोका
मधुकर गोपनारायण.
" जगताचा धनी "
~ ~ ~ ~ ~ ~
लेखणीचा दास झालो
सरस्वती ही माझी माता
कोणताही पक्ष नाही
नको कोणती राजसत्ता ||

मळले सारे राजकारण
नाही कुणीच धुतलेला
प्रत्येकाच्या कापडावर
डाग दिसतो पडलेला ||

जोतो मिरवी आपला टेंभा
खुर्ची साठी ओढाताण
जनतेची ती भेट एकदा
फक्त करावया मतदान ||

आता नको स्तुती कुणाची
नको कुणाची ही निंदा
शब्द ब्रम्हात रंगुन जावे
हाच आमुचा नित्य धंदा ||

रसिकांचे उपकार आहे
त्यांच्यामुळे झालो कवी
लक्ष्मी ही तुमची तुम्हाला
सरस्वती ही आम्हा हवी ||

संत लेखणी झिजली येथे
जन सेवेची परंपरा
शृंगाराने सजली आहे
माय मराठी वसुंधरा ||

श्रीमंती ही दासी त्याची
धनवान ना दुसरा कुणी
शब्द हीच संपत्ती त्याची
कवी हा जगताचा धनी ||

रामदास घुंगटकर •••✍️
९६२३७६५३०२
******
*सवाल*

स्पर्श तुझ्या ओठांचा
नशिबवान ग्लास आहे
मंद धुंदीचा जसा
पहिला जाम आहे

भेटुन भेटल्याचा तेव्हा
आनंद खुप होता
नशेत दिला तू इशारा
तो पहिला पैयाम आहे

नशा मज यौवनाची
तुझ्या कमसिन देहाची
नजर खिळली जिथे
तिथेच पहिला सलाम आहे

बघ जरा वळूनी
रात्र बेहोश झाली
चौधवी चा चांद तू
माझा पहिला खयाल आहे

हयात गेली सारी
सारे किस्से जुने जुने
काय लिहू नव्याने
हाच पहिला सवाल आहे

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक
*९०२२६२२८५७*
★★तमा★★

तमा ना वाटावी हारण्याची
फक्त जिद्द हवी जगण्याची ,

षटकाराची खेळता खेळी
का पळावे धाव घेण्याशी ,

येतील सुखे जातील दुःखे
का गरज मृगजळी धावण्याची ,

उन्ह लोपते अन् अटळ सावली
का लावशी घोर काळजाशी ,

ठेव किताब खुले आयुष्याचे
काय गरज पाने चाळायाची ,

अपंग असती अवयव आपुले
मन बांधील नसते देहाशी ,

दुनिया चमचमती मायाजाळ
नको पडूस तू या मोहाशी ,

दिल्या घेतल्याची दुनिया सारी
ठेव अपुले आपल्या गाठीशी ,

भिऊ नकोस जीवन जगण्याला
धरू नकोस कुणाला वेठीशी ,

राख इमान सुरेख मातीशी
वदे सुरेखा, कर्म अपुले रे आपुल्या पाठीशी .

कवयित्री - सुरेखा बेंद्रे ,
संभाजी नगर .
तुझं माझं प्रेम या
आभाळा एवढं मोठं
रोज नव्याने चालायचं
भांडण आपलं खोट 1

कधी तुला मी खडूस म्हणायचो
तर कधी मंदबुद्धी
पण खरंच माझी राणी
तू आहेस साधी 2

तू काय कमी नव्हती
खोटं खोटं रुसायची
मी तुला मानवाव म्हणून
गाल फुगून बसायची 3

तू रुसल्यावर मी लाडान
तुझे गोरे गाल खेचायचो
तुझं माझ्या डोळ्यातील प्रेम
मी नजरेने वेचायचो ||4|
cp
2024/04/28 22:05:43
Back to Top
HTML Embed Code: