Telegram Group Search
मराठी सुविचार संग्रह
Total Pages - 71
Price -
R̶s̶.̶9̶9̶.̶0̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह. (ebook)
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*अंथरूणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे..!*_

*#हर_हर_महादेव 🚩*
🚩🙏फक्त रयतेला केंद्रस्थानी मानून तिच्याच कल्याणार्थ निरपेक्ष भावनेने चालवलेले पृथ्वीतलावावरील एकमेव शासन म्हणजेच स्वराज्य होय...!!🧡🚩

जय_शिवराय 🙏🏻🚩
🙏जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते.अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐🙏🏻🙏🏻🚩🧡
१० मे १८१८ एक अपरिचीत दिनविशेष “रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम”...🚩

रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला वरून सूर्याची उन्हाळी आग, खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन गडावरही आगच आग.. रायगड होरपळून गेला..

शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला.. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची प्रॉथर गडात आला तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले ब्रह्मावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली असे काही ठिकाणी उल्लेख आढळतात..

रायगडावर उरली फक्त राख सारे वाडे, राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज..
पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती..

आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची..
आंध्र प्रदेश राज्यातील पालनाडू जिल्ह्यातील चिलाकालुरीपेट मतदार संघातील कोंडावेडू या गावात असलेला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा प्राचीन डोंगरी “कोंडावेडू किल्ला”...

कोंडावेडू किल्ला प्रोलया वेमा रेड्डी यांनी बांधला होता. रेड्डी घराण्याने १३२८ आणि १४४२ च्या दरम्यान राजधानी म्हणून त्याचा वापर केला होता, त्यांची पूर्वीची राजधानी अडंकी येथून हलवली होती. तो १५१६ मध्ये विजयनगरचा सम्राट कृष्णदेवरायाने घेतला होता. गोलकोंडा सुलतानांनी १५३१, १५३६ आणि १५७९ मध्ये किल्ल्यासाठी लढा दिला आणि शेवटी सुलतान कुली कुतुबशहाने १५७९ मध्ये तो ताब्यात घेतला आणि त्याचे नाव बदलून मुर्तझानगर ठेवले..

१७५२ मध्ये हा किल्ला फ्रेंच वसाहतवाद्यांच्या ताब्यात आला जेव्हा तो मोठ्या प्रमाणावर तटबंदीत होता. हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे गेले ज्याने १७८८ मध्ये किल्ल्याचे नियंत्रण मिळवले परंतु १९ व्या शतकाच्या सुरुवातीला गुंटूरच्या बाजूने ते सोडून दिले. आता भव्य तटबंदी आणि युद्ध केवळ भग्नावस्थेत दिसतात..

● कोंडावेडू किल्ल्याच महत्त्व :

हे किल्ले एकेकाळी कोंडाविडू रेड्डी राज्याची राजधानी होती जी कृष्णा नदी आणि गुंडलकम्मा नदीच्या दक्षिणेला मर्यादित होती आणि गुंटूर शहराच्या पश्चिमेस १३ किमी अंतरावर होती. अंदाजे १५०० फूट (४६० मीटर) सरासरी उंची असलेल्या टेकड्यांच्या एका लहान श्रेणीच्या उंच कड्यावर उभारले गेले होते (कड्यावरचा सर्वोच्च बिंदू १७०० फूट (५२० मीटर) आहे). दोन टेकडी (घाट) विभाग आहेत, जे डोंगररांगा बनवतात, एक उत्तरेकडे आहे, जो किल्ल्यांमध्ये जाण्यासाठी अतिशय उंच परंतु लहान प्रवेश प्रदान करतो. पसंतीचा प्रवेश अधिक चक्राकार आणि कमी थकवणारा आहे आणि ट्रेकिंगचा समावेश आहे..
गोवा राज्यातला अलोर्ना किंवा हळर्ण किल्ला...

पोर्तुगिजांना शह देण्यासाठी दुसरे फोंड सावंत यांनी हळर्ण येथे शापोरा नदीच्या काठावर भुईकोट बांधला होता. पुढे यावर पोर्तुगिजांनी वर्चस्व ठेवले. प्रामुख्याने जांभा दगडाचा बांधकामासाठी वापर केलेल्या या किल्ल्याने बरेचसे अवशेष आजही शाबूत आहेत. पोर्तुगिजांनीही पुढे त्याचे नुतनीकरण केल्याचे संदर्भ मिळतात. याला अलोर्णा किल्ला म्हणूनही संबोधले जाते. चार बुरूज, चारही बाजूनी तटबंदी, त्यावर तोफा चढवण्यासाठीचा मार्ग अशी याची रचना आहे..

● हळर्णची लढाई :

सिंधुदुर्ग सावंतवाडी संस्थानचे राजे रामचंद्र सावंत आणि त्यांचे काका जयराम सावंत महाराज यांच्या सुरवातीच्या स्वतंत्र कारभार काळात गोव्यात स्थिरावलेल्या पोर्तुगीजांची पिछेहाट झाली; मात्र पोर्तुगीजांचा गव्हर्नर बदलला आणि परिस्थितीही बदलून गेली. पोर्तुगीजांनी सावंतवाडीकरांना शह देत जोरदार 'कम बॅक' केले. यात हळर्ण येथील लढाई सावंतवाडीकरांना धक्‍का देणारी ठरली..

पोर्तुगीजांसाठी १७३७ ते १७४० ही दोन वर्षे नुकसानकारक ठरली होती. वसई भागात पेशव्यांनी आणि गोव्यात सावंतवाडीकरांनी त्यांचा बराचसा मुलुख ताब्यात घेतला होता. १७४४ मध्ये गोव्यात "कोंद दी अशुमर' हा नवा गव्हर्नर जनरल पोर्तुगिज सरकारने नेमला. त्याने पोर्तुगीजांचे वर्चस्व पुन्हा राखण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. हळर्ण (गोवा) येथे झालेली लढाई यात महत्त्वाची ठरली. किल्ल्यावर वर्चस्वासाठी झालेल्या या लढाईचे सविस्तर वर्णन पोर्तुगीजांच्या एका संदर्भ पत्रात आढळते. हे पत्र गव्हर्नर जनरल अशुमर यानेच आपल्या पोर्तुगाल मधील शासनकर्त्यांना पाठवले होते..

याच किल्ल्यावर नवा गव्हर्नर जनरल कोंद दी अशुमर याने पहिला हल्ला केला. याबाबत पोर्तुगीजांनी ठेवलेल्या नोंदीमधील हळर्ण किल्ल्यावरील लढाईचे वर्णन खूप रोचक आहे. ५ मे १७४६ ला पोर्तुगीजांनी लढाई करून सावंतवाडी करांकडून हा किल्ला हस्तगत केला. पोर्तुगीजांनी हल्ल्या साठी हळर्ण किल्लाच पहिल्यांदा का निवडला याचीही कारणे होती. कोलवाळच्या किल्ल्याजवळून वाहणाऱ्या शापोरा नदीच्या किनाऱ्यावरच हा किल्ला आहे. तिथे याला पोरोकाव नदी असेही म्हणायचे. सावंतवाडीकरांचा हा या भागातील सगळ्यात मजबूत किल्ला होता. तो मिळवला तर रेडी आणि डिचोली किल्ल्यावर हल्ला करणे सोपे जाणार होते, पण तो मिळवण इतक सोप नव्हत. यात मुख्य अडचण होती ती दुर्गमतेची. या किल्ल्याजवळ दारूगोळा नेण्याचे आव्हान होते. त्यासाठी गाड्या, ओझी वाहणारे बैल मिळणे मुश्‍कील होते. त्यामुळे माणसांनी हे साहित्य नेणे हाच पर्याय होता..
इतके मनुष्यबळ मिळणेही कठीण होते. अशा स्थितीतही गव्हर्नर जनरल अशुमर याने हल्ल्याचा नियोजित आराखडा बनवला. त्याने सैन्याची दोन टप्प्यात विभागणी केली. आधी जमिनी वरील सैन्याचा अधिकारी पेटीपॉटल यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी हळर्णनकडे नेण्याचा आदेश दिला. पूर्व हळर्णला वेढा घालून थांबण्यापेक्षा पोर्तुगिजांनी एकदम हल्ला करून किल्ल्यापर्यंत मजल मारण्याची रणनिती आखली व ते त्यात यशस्वी झाले. पुढे किल्ला मिळवण्यासाठी खटाटोप सुरू झाला. ५ मे १७४६ ला पहाटे तीन वाजता पोर्तुगिज सैन्याने किल्ल्यावर एकदम हल्ला चढवला. किल्ल्याच्या पहिल्या मोठ्या प्रवेशद्वारावर एक कुलपी गोळा ठेवून तो दरवाजा उडवून दिला, मात्र सावंतवाडीकरांच्या किल्लेदाराने जोरदार प्रतिकार केला. यात पोर्तुगिज सैन्याचे बरेच नुकसान झाले. अनेक सैनिक घायाळ झाले. मृत्यू झालेल्यांची संख्याही मोठी होती. यात पेरीपॉटल हाही जखमी झाला मात्र त्याने शौर्य दाखवत आपल्या सैन्याला उत्तेजन दिले. आत आणखी दोन दरवाजे होते. ते पार करणे कठीण बनले..
.
शेवटी पोर्तुगिज सैन्याने तटबंदिला शिड्या लावून वर चढत आणि खालून हल्ला सुरूच ठेवला. हा हल्ला तसाच काही काळ चालल्यानंतर किल्लेदाराला शरण यायला सांगण्यात आले पण त्याने याला नकार देत पोर्तुगीजांना धुळ चारण्याचा इशारा दिला. यामुळे उरले सुरले पोर्तुगिज सैन्य आणखी निकराने लढू लागले. आतील दरवाजावर हल्ला सुरू केला. सैनिक तटावर चढू लागले पण बळकट तटबंदीमुळे हे सैनिक खाली कोसळू लागले. यात पोर्तुगीजांचे आणखी नुकसान झाले. किल्लेदाराच्या प्रतिहल्ल्यात पोर्तुगीजांची मोठी कत्तल झाली. कित्येक अंमलदार मृत्यूमुखी पडले. यातच हळर्ण किल्ल्याचे बुरूज दारूगोळ्याच्या मोठ्या साठ्याने भरल्याची अफवा पोर्तुगिज सैन्यात पसरली. ते घाबरून पळू लागले; मात्र यावेळी पोर्तुगिज सैन्य अधिकारी सार्जंट मेजर पेट्रो व्हिसेंत याने मोठा पराक्रम दाखवत युद्धाचे चित्रच पालटले. आतील दरवाजाच्या समोर लागलेल्या आगीतून वाट काढत त्या दरवाजाखा ली कुलपी गोळा ठेवला आणि दरवाजा उडवून दिला. यामुळे पोर्तुगीज सैन्याला किल्ल्यात घुसायला मार्ग मोकळा झाला..
दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली. यात पोर्तुगीजांची सरशी झाली मात्र युद्ध इथे संपले नाही. आत त्याहून मजबूत दरवाजा होता. तोही कुलपी गोळ्याने उडवण्यात आला. किल्लेदार, किल्ल्यावरचे लोक, अंमलदार यांना पोर्तुगिज सैन्याने अक्षरशः कापून काढले. यावेळी या सैन्याने क्रूरतेची परिसीमा गाठल्याचा उल्लेख पोर्तुगीजांनीच आपल्या पत्रात केला आहे. ही लढाई पाच तास चालली. पोर्तुगिज शिपायांनीच या किल्ल्याला 'सान्ता क्रूझ दी अलर्न' असे नाव दिले. विजयाचे प्रतिक म्हणून समोर एक क्रूझ उभा केला. पुढे किल्ल्याची दुरूस्ती करून याचा किल्लेदार म्हणून जुजे लोपेस याला नेमण्यात आले..
.
या मोठ्या विजयामुळे पोर्तुगिज सरकारने गव्हर्नर जनरलला 'मार्क्‍किस दी अलर्न' हा किताब दिला. पुढे त्याने तेरेखोल, निवती हे किल्लेही सावंतवाडीकरांकडून जिंकले. २६ ऑक्‍टोबर १७४६ ला डिचोली आणि साखळी या प्रांताच्या देसाईंनी पोर्तुगीजांचे मांडलीकत्व पत्करले. पोर्तुगीजांनी त्यांना सावंतवाडीकरांकडून मिळत असलेले हक्‍क अबाधित ठेवण्याबरोबरच त्यांचे पूर्वीचे गमावलेले हक्‍कही प्रदान केले. शिवाय त्यांना आठशे शिपायांची फौज बाळगायला परवानगी दिली..
.
――――――――――――
📷 @i___digvijay.singh 👌🏼♥️🔥
छत्रपती संभाजी राजेंच्या काळात मराठ्यांनी दक्षिणेत कशी विलक्षण धामधूम माजविली होती व मोगलांची नामांकित शहरे कशी उध्वस्त केली होती हे खुद्द बादशहाचा बंडखोर पुत्र अकबर हा आपल्या बापास काही असे सुनावतो..,

“दक्षिण प्रांताची अशी दुर्दशा झाली आहे, वास्तविक पाहता हा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे भू-वरील स्वर्गाच होय आणि बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ होय, पण आज ते शहर उध्वस्त होऊन गेले आहे. औरंगाबाद शहर आपल्याच नावाने वसविण्यात आले आहे पण शत्रूसैन्याच्या (मराठ्यांच्या) आघाताने ते पाऱ्यासारखे अस्थिर झाले आहे..”

फक्त छ.संभाजीनगरच नाही तर त्याकाळी उत्तरेत काबुल कंधार पासून दक्षिणेस कन्याकुमारी पावेतो राजकीय पाऱ्या प्रमाणे अस्थिर केली होती ती ऐन तिशीतल्या सर्जा “छत्रपती संभाजी महाराजांनी”..

———————————
छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव.
१४ मे, किल्ले पुरंदर.
कोकण किनार्‍यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी आंग्रे..🙏🚩

अंदमान बेटांवर कान्होजींचा (कान्होजी आंग्रे) तळ होता. ही बेटे भारतभुमीला जोडण्याचे श्रेय त्यांनाचं जाते. कान्होजी आंग्रे मराठा आरमारातील अत्यंत पराक्रमी व धैर्यवान नेता होता. कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज, डच यांचा पराभव करत त्यांनी अनिर्बंध सत्ता गाजवली..

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ- शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजी महाराजांनी चौलजवळ सन १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, त्यात प्रथम प्रसिद्धीस आले. इ.स.१६५९ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी गेले. त्यांना मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. इ.स.१६८० तुकोजीं आंग्रेंचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होत..

आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्ना नंतरही कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले..

छत्रपति संभाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दी कासमकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजींनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्‍या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी केला या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली..
.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात पडला आणि छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. इ.स.१६९४-१७०४ च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले; शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी ‘आपण कोकणकिनाऱ्याचे राजे‘ अशी घोषणा केली. मुंबई जवळच्या “खांदेरी आणि उंदेरी” या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुल करायला आरंभ केला. १७ व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापना केली, त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यांस मराठा आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला..
४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवार मधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०,००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले.
या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला..
.
२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली..
.
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले..
● प्रमुख लढाया :
•इ.स.१७०२-कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
•इ.स.१७०६-जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
•इ.स.१७१०-ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (खांदेरी) कब्जा.
•इ.स.१७१२-मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी याचे खाजगी जहाज पकडले. ३०,००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
•इ.स.१७१३-ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
•इ.स.१७१७-ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०,००० रुपयांची खंडणी वसूल केली.
•इ.स.१७१८- मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
•इ.स.१७२०-ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
•इ.स.१७२१-अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा एकत्रित हल्ला असफल.
•इ.स.१७२३-ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.
.
कान्होजींनी मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोकणपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजीं आंग्रेंची जहाजे त्रावणकोर कोचीनपासून उत्तरेस सुरत कच्छपर्यंत समुद्रातून निर्विवाद संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीच्या धंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने देखील त्यांनी उभारले..
.
अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय.एन.एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे..
.
संदर्भ : कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची.
लेखक : श्री.मनोहर माळगावकर.
कुलाबकर आंग्रे सरखेल.(आंग्रे घरण्याचा इतिहास).
लेखक : दामोदर गोपाळ ढबू.
.
――――――――――――
📷 @kadaki_trekkers 👌🏼♥️🔥
_*भाग्यवान लोकांना 'शिवरायांच्या भुमीत' जगायला भेटतं. आणि हे जगणं कसं सार्थकी लावायचं हे शिवनितीतुन शिकायला भेटतं..!*_

*#जय_महाराष्ट्र 🙏🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आपण आपल्या सुखासाठी मोठं मोठ्या गोष्टी शोधण्यासाठी कधी कधी सैरावैरा फिरत असतो पण आपल्या आजूबाजूला असलेल्या छोट छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
2024/05/12 15:42:11
Back to Top
HTML Embed Code: